बेंजामिन लिस्ट आणि डेविड मॅकमिलन यांना रसायन शास्त्रातील नोबेल जाहीर

0

नवी दिल्ली : आज रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अॅसिमेट्रिक ऑर्गेनकॅटालिसस क्षेत्रातील संशोधनासाठी बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यू.सी. मॅकमिलन यांना यंदाचा रसायन शास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

जर्मनीच्या बेंजामिन लिस्ट आणि अमेरिकेच्या डेव्हिड डब्ल्यूसी मॅकमिलन यांनी मॉलिक्यूलर कंस्ट्रक्शनसाठी एक अचूक आणि नाविन्यपूर्ण उपकरण विकसित केलं आहे. या उपकरणाचा औषधाच्या संशोधनावर मोठा परिणाम झाला आहे. रसायनशास्त्रज्ञांसाठी उत्प्रेरक हे मूलभूत साधन आहे, परंतु संशोधकांचा बराच काळ असा विश्वास होता की, तत्त्वानुसार केवळ दोन प्रकारचे उत्प्रेरक उपलब्ध आहेत. यापैकी पहिला एक धातू आणि दुसरा एंजाइम. पण, 2000 मध्ये बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांनी तिसऱ्या प्रकारचे उत्प्रेरक विकसित केले. याला अॅसममित ऑर्गनोकॅटालिसिस म्हणतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 06-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here