जिल्ह्यात आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. जिल्ह्यात सार्वजनिक तसेच खासगी ५०५ ठिकाणी दुर्गामूर्ती व प्रतिमांचे पूजन होणार आहे. तब्बल ३० हजारांहून अधिक ठिकाणी ‘घटा’चे पूजन केले जाणार आहे. यावेळी कोरोनाचे नियम, अटी व शर्थी घालून उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. यावर्षीही साधेपणाने उत्सव साजरा केला जाणार आहे. राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता नवरात्रोत्सवापासून नियम व अटींमध्ये राज्यातील मंदिरे उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सवालाही परवानगी देण्यात येत असल्यामुळे या वर्षी सार्वजनिक मूर्ती स्थापन करण्यास मंडळे सरसावली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ग्रामदेवतांच्या मंदिरात मोठे उत्सव साजरे केले जातात. महिला भगिनी अनेक ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करीत असतात. त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्सव मंडळांतर्फे मूर्ती, फोटो व घट यांची स्थापना करुन उत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये ३९५ ठिकाणी सार्वजनिक मंडळांतर्फे मूर्ती स्थापन केली जाणार असून ५८ मंडळांतर्फे प्रतिमा पूजन करुन उत्सव साजरा करण्यात येतो तर २४३ ठिकाणी सार्वजनिक मंडळांतर्फे घट पूजन केले जाते. जिल्हयात खासगीरीत्या ५२ ठिकाणी मूर्ती स्थापन केली जात तर तब्बल ३० हजार ४९३ ठिकाणी खासगीरीत्या घट पूजन केले जाते. जिल्हयात सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात १६५ ठिकाणी सार्वजनिक मंडळातर्फे मूर्ती पूजन केले जाते तर सात ठिकाणी खासगी घरगुती पध्दतीने मूर्तीचे पूजन होते. संगमेश्वर तालुक्यात ३५ ठिकाणी मंडळातर्फे, राजापूर तालुक्यात १६, लांजा १५, चिपळूण तालुक्यात २७, गुहागर २९,खेड २३, दापोली तालुक्यात ३५ तर मंडणगड तालुक्यात ५० ठिकाणी सार्वजनिक मंडळातर्फे मूर्ती पूजन केले जाते. आदिशक्तीच्या या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी मंडळांनी मंडप उभे केले आहेत. याहीवेळी दांडिया, गरब्याला परवानगी नसली तरी मंदिरे दर्शनासाठी उघडणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह पसरला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:19 AM 07-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here