रत्नागिरीतील श्रीकृष्ण पंडित यांच्या फोटोना गुगल मॅपवर ६५ लाख व्ह्यूज

0

रत्नागिरी : गुगल मॅप म्हणजे आता एक चालता बोलता ज्ञानकोष झाला आहे. याच्या माध्यमातुन एखाद्या इप्सित स्थळी आपण रस्ता न चुकता जाउ शकतो आणि वेळ व पायपीट वाचवू शकतो. स्थळ मग ते कोणतेही असो त्याची छायाचित्रासहीत माहिती आपणास मिळते. पण हे सर्व अदृष्य हातांकरवी होत असतं. त्यानाच म्हणतात “गुगल लोकल गाईड” जगातील अशा हौशी माणसांकडून अशी स्थळं ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात त्यांचे फोटो व माहीती गुगल मॅप मध्ये अंतर्भूत केली जाते. याच्या एकुण १० स्तर अर्थात लेव्हल आहेत. माहिती फोटो स्थळ प्रश्नोत्तरे अशा विविध माध्यमातुन त्याना पॉईंट दिले जातात व त्यांच्या संख्येवर लेव्हल वाढत जात असते.
रत्नागिरीत गेली तीस वर्षे संगणक क्षेत्रात काम करत असलेले आणि सर्वोपरिचित असलेले श्रीकृष्ण (मायकेल) पंडित यानी या कामगिरीत मोठ्ठाच उच्चांक गाठला असुन ते सध्या दहा स्तरातील सातव्या स्तरावर काम करत असून त्यानी नोंदविलेल्या स्थळांचे फोटो व माहीती याना ६५ लाख व्ह्युज मिळाले आहेत. फिरत असताना जी जी स्थळे प्रसिद्धीस आलेली आहेत त्यांची माहिती व छायाचित्रे गुगल मॅपवर अपलोड करण्याचा छंद ते नेहमीच जोपासत असतात. गुगल वरील त्यांचा ३२ व्या स्तरावर क्रमांक लागला आहे. या संदर्भात समाजातील साऱ्या मित्र्र परिवाराकडून त्यांचे कौतुक होत असून अनेक जणानी शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 07/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here