भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी-२० त्यानंतर वनडे आणि आता कसोटी मालिका सुरु होणार आहे. सराव कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियावर २६३ धावांमध्ये ऑल आऊट होण्याची वेळ आली आहे. दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे २६३ वर पूर्ण संघाला थांबावे लागले. हनुमा विहारीने शतक आणि चेतेश्वर पुजाराने ९३ धावा केल्यामुळेच भारतीय संघाला ही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
