ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : हसन मुश्रीफ

0

पुणे : राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकासाचे अनेक विभाग जिल्हा परिषदेशी जोडले गेले आहेत. शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासातील अडचणी गतीने सोडविण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी यासाठी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी योजना सुरू करून राज्याने देशासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, 28 हजार कोटी रूपयांचा 15 वा वित्त आयोग आहे. यामध्ये 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के जिल्हा परिषद व 10 टक्के पंचायत समिती असा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे निर्णय घेतले जात असताना लोककल्याणाची भूमिका ठेवून ग्रमाविकास विभागाने काम करावे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्य शासनाने चांगली कामगिरी केली आहे. महाआवास योजनेच्या माध्यमातून सहा लाख घरे ग्रामविकास विभागाने बांधली आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य, गरिब कुटुंबाचे घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. राहीलेली 2 लाख 62 हजार घरेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’च्या माध्यमातून चांगले कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात बचतगटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही मुश्रीफ यांनी दिले. अपर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून पथदर्शी काम राज्यात झाले आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आजची कार्यशाळा निश्चितपणे नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 07-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here