रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी : २०२०

0

ही संपूर्ण टेनिस क्रिकेटविश्वातील एक बहुमानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.या बहूमानाच्या स्पर्धेत,स्पर्धेच्या पाचव्या दिवशी खेळण्यात आलेला रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र हा महामुकाबला अतिशय रंगतदार अवस्थेत पार पडला.

IMG-20220514-WA0009

रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून रायगड संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
रायगड संघामार्फत उस्मान पटेल सहित योगेश पेनकर हे दोन महान फलंदाज सलामीला आले. उस्मान पटेल ने डावाच्य सुरवातीपासूनच चौकार षटकारांच्या आतिषबाजीला सुरवात केली. या उस्मान ने प्रेक्षकांसहित साऱ्या क्रिडारस्सीकांची मनें जिंकत १० चेंडूचा सामना करत एकही एकेरी दुहेरी धाव न घेता १ चौकार तसेच ५ गगनचुंबी षटकार लागावत कुटल्या स्वतःच्या वैयक्तिक ३४ धावा. त्याचा साथी योगेश पेनकर ने ५ चेंडूचा सामना करत २ चौकारांच्या साहाय्याने उस्मानला योग्य ती साथ देत कुटल्या स्वतःच्या वैयक्तिक १० धावा. या दोन फलंदाजांच्या एका सन्मानजनक भागीदारीच्या जोरावर रायगड संघाची धावसंख्या पहिल्या ३ षटकात ५२ धावांवर जाऊन पोहोचली. प्रजोत अंबीरे,सागर कांबळे हे दोन महान गोलंदाज सुरवातीच्या दोन षटकात काहीशे महाग ठरले. तदनंतर रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघातर्फे जलदगती गोलंदाज विजय पावले गोलंदाजीला आला. विजय पावले ने एकाच षटकात उस्मान सहित योगेश ला बाद करत आपल्या रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाचं सामन्यात पुनरागमन केलं. तदनंतर त्यांच्या पाठोपाठ आकाश तारेकर,प्रथमेश म्हात्रे,जीवित म्हात्रे हे महत्वाचे फलंदाज ही स्वस्तात बाद झाले आणि ६ षटकांच्या समाप्तीनंतर रायगड संघाला ६६ धावाच करता आल्या. रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघामार्फत विजय पावले (२-०-११-३),प्रजोत अंभीरे (२-०-२७-१),अभिजित दुधे (१-०-८-०),सागर कांबळे (१-०-२०-०) या महान गोलंदाजांनी सन्मानजनक गोलंदाजी केली.
उस्मान पटेलची टोलेजंग फलंदाजी,विजय पावलेची वाऱ्याशी वार्तालाब करणारी अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी, प्रजोत अंभीरेने पहिल्या षटकात काहीसा महागडा ठरल्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या षटकात घडवून आणलेलं परिवर्तन,शेवटच्या षटकात अभिजीत दुधेने केलेला आपल्या गोलंदाजीचा अचूक मारा हे या पहिल्या डावाचं खरे वैशिष्ट्य ठरले.

६ षटकात ६७ धावांचा पाठलाग करण्यासाठी रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघ फलंदाजीला उतरला. कृष्णा सातपुते सहित मुन्ना शेख दोन महान फलंदाज सलामीला आले. दोन्हीही फलंदाजांनी डावाची सुरवात मात्र दमदार केली. रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाच्या पहिल्या २ षटकात २७ धावा झाल्या. सामना रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाच्या बाजूने एकतर्फी झुकतोय की काय असे वाटू लागले मात्र त्या नंतर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील देवद गावचा चमचमता सीतारा मिस्टर.मयुर वाघमारे गोलंदाजीला आला. या मयुर ने अक्षरशः आपल्या उजव्या हाताच्या जलदगती गोलंदाजीची आगचं ओकली. आपल्या पहिल्या षटकात मयुर ने मुन्ना शेख (१६ धावा ८ चेंडू),थॉमस डायस (० धावा २ चेंडू),श्रेयस इंदुलकर (० धावा १) या तीन महान फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर रायगड संघामार्फत पुन्हा एकदा परिवर्तन घडवून आणले. यांच्या मागोमाग महान फलंदाज ओंकार देसाई सुद्धा अवघी १ धाव करून तंबूच्या दिशेने परतला. तदनंतर मयुरने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कृष्णा सातपुते (१७ धावा १२ चेंडू) सारखा मोठा अडथळा दूर केला. रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघ मोठ्या अडचणीत सापडला. तदनंतर फलंदाजीला आलेल्या उमर खान ने आपल्या फलंदाजीची आगचं ओकली. उमर खान ने ८ चेंडूचा सामना करत २ चौकार,२ षटकार ठोकत स्वतःच्या वैयक्तिक २२ धावा केल्या खऱ्या परंतु शेवटच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज असताना काय झालं ?
तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील इनामपुरी गावचा सुपरस्टार, रायगडचा ब्रेट-ली म्हणजे अंगद पाटील गोलंदाजीला आला, त्याने आपल्या उजव्या हाताच्या अचूक टप्प्याच्या मिश्रणयुक्त गोलंदाजीच्या जोरावर उमर खान सहित अजित मोहिते या दोन फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवण्यात यश मिळवले अवघ्या ४ धावा देत उमर खान ला बाद करत या महत्त्वाच्या सामन्यात आपल्या रायगड संघाला ४ धावांनी विजय मिळवून दिला.
२ षटकात २२ धावा देत मोक्याच्या क्षणी ४ बलाढ्य गडी बाद करणारा मयुर वाघमारे ठरला सामन्यातील सामनावीर.
या विजयासोबत रायगडकारांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवून दिले की या टेनिस क्रिकेट विश्वात आम्ही पण कुठे कमी नाही. क्रिकेट हा एक जिद्दीचा खेळ आहे आणि ती जिद्द इतर जिल्ह्यांप्रमाणे आमच्यात सुद्धा ठासून भरलेली आहे.
रायगडकरांचे संपूर्ण टेनिस क्रिकेटतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन, सहित त्यांना एक मानाचा, हक्काचा तसेच सन्मानाचा सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here