गेल्या 5 वर्षात देशातील बेरोजगारी आणि महागाई वाढतंच चालली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच महागाईचा भडका उडालाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्र सरकारमुळेच तरुणांना बेरोजगारी सोसावी लागत आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी यावेळी केंद्र सरकारवर केला आहे.
