गुहागर : तालुक्यातील मोडकाआगर येथे गुरुवारी सायंकाळी ३.३० च्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये श्री पूजा फार्म हाऊसमधील मीटर आणि वायरिंग जळून खाक झाले. यामध्ये महेंद्र आरेकर यांचे २५ हजारांचे प्राथमिक नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा एकदा मोडकाआगर तसेच गुहागर यांच्या मधील जंगलात वीज पडल्याने पेठे ब्रेक मोटर्स कंपनीच्या आवारातील विद्युत रोहित्रावरील तिन्ही डीओ जळाले. वीज वीज पडल्याचे समजल्यावर महावितरण कर्मचारी पी. एस. यादव तत्काळ घटनास्थळी धावत घेत उपाययोजना करून अन्य ठिकाणचा बंद वीजपुरवठा सुरू केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 08-Oct-21