शौचालयात कुत्र्यासोबत अडकलेल्या बिबट्याची सुटका

0

भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम  कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली मात्र त्यातून हा कुत्रा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या शौचालयात घुसला कुत्र्या पाठोपाठ बिबट्या देखील शौचालयात घुसला मात्र त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्याने कुत्रा व बिबट्या आतमध्ये आडकले होते ही कांबळे ज्यावेळी शौचालयासाठी जण्यासाठी आले त्यावेळी त्यानी दरवाजा उघडला त्यावेळी बिबट्या आणि कुत्रा आतमध्ये दिसले त्यांनी तातडीने दरवाजा पुन्हा बंद करून वन विभागाशी संपर्क केला वन विभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहचले व शौचालयाचा वरील भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले चार वर्षांची मादी बिबट्या असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here