‘शिक्षण सहसंचालकांची पदे ‘एमपीएससी’द्वारे भरावीत’

0

राजापूर : शिक्षण सहसंचालक पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) केल्यास या पदास न्याय मिळेल. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व कामे जलदगतीने करण्यास मदत होईल. या उद्देशाने सदर नेमणुका या एमपीएससीद्वारे करण्यात याव्यात, अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे, महाराष्ट्र धर्म निरपेक्ष शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार आणि महासचिव डॉ. शांतज देशभ्रतार यांनी केली आहे. एमपीएससीद्वारे शिक्षण सहसंचालक यांची नेमणूक झाल्यास विविध कामे जलदगतीने होण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र धर्म निरपेक्ष शिक्षक संघटनेने म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 08-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here