सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद!

0

 सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालीय. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून १७ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. पुढच्या ३ महिन्यामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी असे ८ ब्लॉक घेण्यात येणार आहेत. सायन उड्डाणपुलाचे महत्व लक्षात घेऊन आठवड्यातील ४ दिवस या पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये बेअरिंग बदलल्यानंतर पूल पुढचे २० दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातून मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रखडले होते. मात्र आता शुक्रवारपासून हे काम सुरु करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत काम सुरू राहणार आहे. एकूण ८ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाने मंजुर केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here