भीमा-कोरेगावचा तपास NIAकडे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीवर मित्रपक्ष नाराज

0

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास पुणे पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. मात्र सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबतचा तपास एनआयकडे देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्य सरकारकडून काढून घेणं अयोग्य आहेच. त्यापेक्षा त्याला मान्यता देणं जास्त अयोग्य आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here