मागील वर्षी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. लेथपोरा भागातील कँम्पमध्ये हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे उद्घाटन आज करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पुलवामा हल्ल्यांत प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी करण्यात आले आहे. हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावासह त्यांची फोटो स्मारकामध्ये लावली आहेत. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे, सीआरपीएफचे विशेष महासंचालक जुल्फिकार हसन यांनी सांगितले.
