‘एअर इंडिया’ पुन्हा ताब्यात आल्यानंतर रतन टाटा भावूक; म्हणाले, ‘वेलकम बॅक, एअर इंडिया!’

0

नवी दिल्ली : तब्बल ६८ वर्षांनंतर सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. एअर इंडियासाठी सरकारने टाटा समुहाची निवड केली. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली आणि जिंकली. दरम्यान, यासंदर्भात रतन टाटा यांनी ट्विट केले आहे. “टाटा समूहाने एअर इंडियासाठी बोली जिंकली ही एक चांगली बातमी आहे. एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल, हे मान्य असले तरी, विमान उद्योगात टाटा समूहाच्या उपस्थितीला बाजारपेठेची एक मजबूत संधी मिळेल अशी आशा आहे”, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, “जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. जेआरडी टाटा आज आमच्यामध्ये असते तर त्यांना खूप आनंद झाला असता”, असे भावनिक ट्विट रतन टाटा यांनी केले आहे. तसेच, खाजगी क्षेत्रासाठी निवडक उद्योग उघडण्याच्या सरकारच्या अलीकडील धोरणाबद्दल आपण ओळखले पाहिजे आणि आभार मानले पाहिजेत असे सांगत एअर इंडियाचे रतन टाटा यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, १९३२ मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि एअर इंडिया असे याचे नामांतरण झाले. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसेच मोदी सरकारने २०१७ मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती. आज टाटा समुहाने बोली जिंकली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:59 PM 08-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here