रत्नागिरी: गुरुवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास शहरातील आठवडा बाजार येथे अज्ञात वृद्धा मृत आढळून आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत संजय अनंत चव्हाण (५१, रा. आठवडाबाजार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, संजय चव्हाण यांचे आठवडा बाजार येथे सलून आहे. गुरुवारी ते आपल्या सलूनमध्ये जात असताना त्यांच्या नजिकच्या शेडमध्ये एक वृध्दा मृत पडलेली आहे.
