प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

0

दापोली : तालुक्यातील कुडावळे आदिवासीवाडी येथील रंजना पवार या वीस वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना पवार हिची प्रसूती सकाळी सहा वाजता झाली. प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने तिला अशक्तपणा जाणवू लागला म्हणून अधिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून दुपारी एक वाजता मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 09-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here