सध्या देशात छपत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून राजकारणाने जोर धरला आहे. त्यातच मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये अतिक्रमण हटाव मोहीमेत ज्या चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणी महाराष्ट्रातले कॉंग्रेस नेते राजीव सातव, मंत्री सुनील केदार यांनी तातडीने हा विषय कमलनाथ यांच्या कानावर घातल्याने आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणाहून हा पुतळा हटवण्यात आला होता, तिथेच योग्य जागेवर शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विधीवत स्थापन होणार असून त्या स्मारकाच्या शीलान्यासासाठी स्वत: मुख्यमंत्री कमलनाथ हजर राहणार आहेत.
