चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. एखाद्या दलित व्यक्तीने त्याच्या गळ्यात ख्रिश्नच धर्माचे क्रॉस घातले किंवा इतर प्रतिकांचा वापर केला, तसेच इतर कोणत्याही धर्माचे पालन केले तर त्याचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार नाही असं मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. रामनाथपूरम या ठिकाणच्या एका महिला डॉक्टरने यासंबंधी एक याचिका दाखल केली होती. या महिलेने एका ख्रिश्चन व्यक्तीसोबत लग्न केलं असून तिच्या क्लिनिकवर ख्रिश्चन धर्माचे क्रॉस कोरलं आहे. केवळ या कारणामुळे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्रक देणाऱ्या समितीने तिचे प्रमाणपत्र रद्द केलं होतं. या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी आणि न्यायमूर्ती एम दुराईस्वामी यांच्या खंडपीठाने सांगितलं की, हे शक्य आहे की ती महिला चर्च मध्ये गेली असेल. पण केवळ चर्च मध्ये जाणे म्हणजे असा अर्थ होत नाही की तिने आपली सर्व मतं बदलली. त्या महिलेचे जात प्रमाणपत्रक रद्द केलेल्या अधिकाऱ्यांची मानसिकता यावरुन स्पष्ट होतेय. कोणत्याही सबळ पुराव्याअभावी अशा प्रकारे जात प्रमाणपत्रक रद्द करणे चुकीचं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 09-Oct-21