रत्नागिरी नगरपालिकेची प्लास्टिक विरोधातील मोहीम आता पूर्णपणे थांबल्याचे दिसत आहे. फळविक्रेते, भाजी विक्रते, दुकानदार खुलेआमपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशवीतून सामान देत असल्याचे पहावयास मिळत आहे. रत्नागिरी साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राउंडवर दिवसाला कचऱ्यातून येणारे प्लास्टिक प्रचंड प्रमाणात जमा होत असून याविरोधात रत्नागिरीतील काही जागरूक नागरिक आवाज उठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
