मुलाचे अपहरण केल्याबद्दल अज्ञताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी: कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शिक्षण घेणारा १३ वर्षीय मुलगा निखिल अरुण कांबळे (रा.नवीन वसाहत, मिरजोळे पाडावेवाडी, ता. रलागिरी) हा शाळेतून दुपारी घरी परतल्यावर शिकवणीला जातो, असे आजीला सांगून गेला परंतु नंतर तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद निखिलची आई अनुष्का अरुण कांबळे यांनी पोलीस स्थानकात केली आहे. निखिल बुधवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे सेंट थॉमस स्कुलमध्ये गेला होता. त्याचे आई, वडिल सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर निखिल दिसला नाही. त्यामुळे ओळखीच्या ठिकाणी संपर्क करून त्याचा शोध घेण्यात आला. अखेर त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद रलागिरी शहर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here