देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाची थकीत वेतन किमान दिवाळी सणापूर्वी मिळावे, अन्यथा ग्रामपंचायतीची केली जाणारी घरपट्टी आणि पाणीपट्टी ही करवसूली केली जाणार नाही, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष कृष्णा होडे यांनी दिली. कर्मचारी वर्गाचे किमान वेतन गेली तीन महिन्यांत बँक खात्यात जमा झालेले नाही. तसेच ग्रामपंचायतीकडून न मिळणारा हिस्सासुद्धा कर्मचारी यांना दिलेला नाही. वाढीव घराप्रमाणे किमान वेतन देण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देऊनही याकडे केवळ दुर्लक्ष केले जात आहे. याचसाठी संघटनेने कठोर भूमिका घेत दिवाळीपूर्वी किमान वेतन न दिल्यास ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे काम कर्मचारी वर्ग करणार नाहीत. तालुक्यात शंभर टक्के या कामावर बहिष्कार टाकला जाणार आहे, असे कृष्णा होडे यांनी नमूद केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 09-Oct-21