मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयांकडून माहिती मागवली होती. त्यानुसार, शैक्षणिक परीक्षण झालेल्या महाविद्यालयांची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक यांना महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम, फी, पायाभूत सुविधा यांसह अनेक उपक्रमांची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
