मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच मार्गी लावू : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

सिंधुदुर्ग : गोव्याचे नवीन विमानतळ झाले, तरी सिंधुदुर्ग विमानतळामुळे जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा विकास होणार आहे. त्यादृष्टीने चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. दरम्यान रत्नागिरी पासून रायगड पर्यंत पुढे जाणारा हायवे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढविण्यासाठी प्रयत्न केला जावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.पवार पुढे म्हणाले, गोव्या इतकेच चांगले समुद्रकिनारे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले आहेत. त्यात सिंधुदुर्ग विमानतळाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आणखीन भर घातली आहे. त्याचा फायदा येथील लोकांना होईल तर सिंधुदुर्ग विमानतळ होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन हा प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यामुळे याचे श्रेय कोणा एकट्याला जात नाही, असेही त्यांनी सांगितले. तर ज्या प्रमाणे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाले त्याचप्रमाणे लवकरात-लवकर या ठिकाणी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुद्धा लोकार्पण आम्हीच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान गोव्यात नव्याने आणखीन एक विमानतळ होत आहे. मात्र सिंधुदुर्ग विमानतळाच्या माध्यमातून आपण प्रवाशांना चांगली सेवा दिल्यास जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणीच विमानातून उतरतील त्यामुळे येथील एअरपोर्ट प्रशासनाने त्याची काळजी घेऊन त्या दृष्टीने सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:58 PM 09-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here