रत्नागिरी एस.टी. विभाग नियंत्रक सुनील भोकरे कार्यमुक्त

0

रत्नागिरी : रत्नागिरी एस.टी. विभाग नियंत्रकपदी असलेले सुनील भोकरे हे नुकतेच कार्यमुक्त झाले असून, शनिवारी त्यांनी सांगली एस.टी. विभाग नियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. मात्र अद्यापही नवीन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी रत्नागिरीचा कार्यभार स्वीकारलेला नाही. सुनील भोकरे यांची महिनाभर आधीच विनंती बदली सांगली येथे झाली होती. मात्र रत्नागिरी विभाग नियंत्रक म्हणून कोणी हजर न झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. अखेर शुक्रवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी शनिवारी सांगली एसटीचा विभाग नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला. आता नवीन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे कधी पदभार स्वीकारणार याकडे एस.टी. कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 11-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here