म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर फाटा येथे बेदरकारपणे कार चालवून म्हशीला पाठीमागून जोरदार धडक देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. अभिषेक बनकर (रा.चांदोर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात गंगाराम भण्या कोकरे (३३,रा.चांदोर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ते आपली गुरे चरवून घरी नेत होते. ते चांदोर फाटा येथे आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या एका म्हशीला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, त्यात म्हशीचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार चव्हाण करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 11-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here