निर्भया प्रकरण: सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बेशुद्ध

0

2012 च्या दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आर भानुमती बेशुद्ध पडल्या. त्यामुळे, आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात निर्भयाच्या आरोपींना वेगवेगळी फाशी देण्याच्या निवेदनावर सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती आर भानुमती यांची अचानक तब्येत बिघडली. त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना लगेच त्यांच्या चेंबरमध्ये आणण्या आले. तसेच पीठाने सुनावणी पुढे ढकलण्याचे जाहीर केले. अधिवक्ता तुषार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ताप आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here