कोळसा संकटावरून मिनिष सिसोदियांचा भाजपावर हल्लाबोल

0

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीतील वीज प्रकल्पांमध्ये निर्माण झालेल्या कोळशाच्या संकटावरून भाजपावर निशाणा साधला. दिल्लीत जर २४ तासांचाच कोळसा शिल्लक राहिला तर आम्हाला भारनियमन करावं लागेल असं विधान केलं. तसंच अनेक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता आहे आणि काही वीज प्रकल्प यामुळे बंदही झाल्याचे ते म्हणाले. आता कोळसा समस्येवरून राजकारणालाही सुरूवात झाली आहे. मनिष सिसोदिया यांनी कोळसा संकटाच्या शक्यतेवरून वरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून आता देश चालवला जात नाही आणि ते आता या संकटापासून पळ काढण्याचा मार्ग शोधत आहेत, असं सिसोदिया म्हणाले. “आम्ही ऊर्जा मंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली. कोळशाची कोणतीही कमतरता नाही असं त्यांनी सांगितलंय ऊर्जा मंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेल्या पत्रावरही आक्षेप घेतला. परंतु हे केंद्रीय मंत्र्यांनी बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे.” असं त्यांनी नमूद केलं. “अशाचप्रकारे काही महिन्यांपूर्वी देशात ऑक्सिजनचं संकट निर्माण झालं होतं. तेव्हादेखील केंद्रानं ते मानलं नव्हतं. अनेक राज्यांनी केंद्राकडे आवाहन केलं, परंतु केंद्रानं ऐकलं नाही. तेव्हा मोदी सरकार डोळे बंद करून बसलं होतं आणि आताही ते कोळशाची कमतरता नसल्याचं सांगत आहेत,” असं ते म्हणाले. “भाजपकडून केंद्रात सरकार चालत नाही, त्यांच्याकडून देश चालवला जात नाही आणि जबाबदारीपासून पळ काढण्याचे काम ते लोक करत आहेत. कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकट निर्माण होऊ शकतं. केंद्राकडून डोळे बदं करून बसण्याचं धोरण घातक ठरू शकतं. कोळशाचं संकट हे वीज संकटच आहे, हे देशाला खड्ड्यात घालण्याप्रमाणेच आहे,” असंही ते म्हणाले

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:23 PM 11-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here