तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे शनिवार (दि. १५) रोजी संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य शोभायात्रा, श्री विष्णू पंचायतन याग, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन, असे कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्यानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्याची सुरवात दि. १४ रोजी होणार आहे.
