खेडमधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

खेड : शहर शिवसेना, युवा सेना, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने रविवारी दि. १० रोजी खेड शहरातील खांबतळे येथील बहुउद्देशीय सभागृहात जनकल्याण रक्तपेढी महाडच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्य सुनील दरेकर, सर्व शिवसेना नगरसेवक, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, कुंदन सातपुते यांच्यासह शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीतील कर्मचारी व शिवसैनिकांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:43 PM 11-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here