दिलासादायक : जिल्ह्यात केवळ 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 84 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात केवळ 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर नव्याने 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात 93 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 581 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.30 टक्के आहे. नव्याने 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 489 इतकी झाली आहे. मागील 24 तासात 2 तर यापूर्वीचे 2 असे 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 444 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 23 तर संस्थात्मक विलगीकरणात 228 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:04 PM 11-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here