कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

0

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे चीनमधील व्यवहार थंडावले आहे. परिणामी चिनी अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याने त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारदेखील घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०६ अंशांनी घसरून तो ४१ हजार ४५९ अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६ अंशांनी घसरण झाली. तो १२ हजार १७४ अंशांवर बंद झाला. महागाईचा उच्चांक आणि औद्योगिक विकासाच्या सुमार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी बाजारात शेअर विक्रीला अधिक प्राधान्य दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here