रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ शाखा लांजाच्या वतीने निदर्शने

0

लांजा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ शाखा लांजाच्या वतीने लांजा तहसील कार्यालयासमोर सोमवारी दि. ११ ऑक्टोबर रोजी घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडल अधिकारी समन्वयक महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल ऊर्फ आप्पा यांच्याबद्दल जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणेचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केले होते. याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शन केली. यानंतर लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानदेव डुबल यांच्याबद्दल सोशल मीडियावर जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणेचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी आक्षेपार्ह मेसेज करून राज्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी कारकून आणि नायब तहसीलदार यांचा अपमान केला आहे. त्यामुळे जगताप यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासाठी संपूर्ण राज्यात संघटनेच्या वतीने ११ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी लांजा तहसील कार्यालयासमोर तलाठी संघटनेच्या वतीने निदर्शने केली. यावेळी तलाठी संघाचा विजय असो, अभी नही तो कभी नही, कोकाटे साहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. सदरची निदर्शने करताना तलाठी संघटनेचे अध्यक्ष एम. आर. जाधव, लांजा राजापूर उपविभाग संघटक एस. पी. मराठे, उपाध्यक्ष आय. एस. थुल, सचिव ए. एन. वंजारे, तसेच सिद्धी शिवलकर, आर. एम. गोरे, आर. एम. वळवी, सी.एस.मरमर, जिज्ञा वागळे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 12-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here