बळीराम परकर विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका तथा कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर यांचा अमृतमहोत्सव साजरा होणार

0

मालगुंड : मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर माध्यमिक विद्यालय मालगुंडच्या माजी मुख्याध्यापिका तथा कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर यांना यावर्षी वयाची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा अमृतमहोत्सव कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थीप्रिय असलेल्या नलिनी खेर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण अध्यापनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले. त्या अत्यंत शिस्तबद्ध स्वभावाच्या असल्या तरी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास हा त्यांच्या शिस्तीच्या आणि अध्यापनाच्या केंद्रस्थानी होता. आपल्या उत्तम आणि नियोजनपूर्वक कार्यामुळे त्यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळत संस्थेचा गुणवत्तापूर्ण लौकिक वाढविताना विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्यात योग्य समन्वय राखला. त्यामुळे त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. शैक्षणिक क्षेत्रातुन निवृत्त झाल्यानंतर स्वस्थ न बसता कवी केशवसुत स्मारकाचे कार्यवाह पद मागील अनेक वर्षे सांभाळत कोमसापचे आणि झपुरझासाठी अनेक सभासद जोडून घेतले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कवी केशवसुतांच्या जन्मगावात साहित्यिक चळवळ रुजविण्यात महत्वाची भूमिका उठवतानाच कवी केशवसुत स्मारकाचे कार्यवाहपद त्यांनी अनेक वर्षे यशस्वीरीत्या सांभाळले. याच सर्व बाबींचा विचार करत त्यांच्या वयाची पंचाहत्तरी अर्थात त्यांच्या वयाचा अमृतमहोत्सव नलिनी खेर मॅडम यांचे माजी विद्यार्थी तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती शरद बोरकर आणि कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि सर्व विश्वस्त यांची परवानगी घेऊन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी नलिनी खेर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील आजी-माजी विद्यार्थी, त्यांचे सहकारी असलेले आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सभासद यांच्यासह त्यांचे नातेवाईक यांना याद्वारे नम्र विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी येत्या शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२० रोजी दुपारी २ वाजता कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि नलिनी खेर मॅडम यांचेच माजी विद्यार्थी असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती शरद बळीराम बोरकर यांच्या संयोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या अमृतमहोत्सवी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमासाठी कोमसापचे विश्वस्त तथा माजी न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये, अरुण नेरुरकर, रमेश कीर, कोमसापचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क कवी केशवसुत स्मारक मालगुंड – ०२३५७/२३५३५०, शरद बोरकर – ९४२१२३३३६९, स्मिता बापट – ९४२१२३३८७९, श्रुती केळकर – ९४०३८००४२०, अमेय धोपटकर – यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here