रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिक संघातर्फे उद्या मोफत नेत्र तपासणी

0

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १३ ऑक्टोबर २०२१ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये व्हिजुअल ॲक्युइटी टेस्ट, कलर व्हिजन टेस्ट, कॉन्ट्रास्ट टेस्ट, ऑटो रिफ्रॅकशन, चष्म्याचा ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह पद्धतीने अचूक नंबर, स्लिट लॅम्प एक्झामिनेशन, नॉन कॉन्टॅक्ट टोनोमेट्री, रेटिनोस्कोपी, इंडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी आणि आवशक्यता असल्यास डायलेटेड फन्डस चेक या तपासण्या मोफत केल्या जातील. या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आव्हान ज्येष्ठ नागरिक संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे. शिबिर रत्नागिरीत शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 12-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here