माखजन भागातील मार्ग निवाऱ्यांची दुरवस्था

0

आरवली : माखजन भागातील प्रवासी मार्ग निवाऱ्यांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रवासी मार्गनिवारे बांधण्यात आले आहेत. प्रवाशांना एस.टी. बस थांब्यांवर थांबण्यासाठी सोय व्हावी यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कोंडिवरे, सरंद आणि माखजन येथे प्रवासी मार्ग निवारे बांधण्यात आले आहेत. या प्रवासी मार्ग निवाऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सरंद आणि माखजन येथील मार्ग निवाऱ्यावर गवत रुजले आहे. तसेच आतील प्लास्टर, लाद्या खराब झाल्या आहेत. कोंडिवरे येथील ग्रामपंचायत समोरील प्रवासी मार्ग निवाऱ्याची अवस्था अगदी बिकट आहे. या शेडवरील पत्रे बदलण्याची गरज आहे. प्रवासी मार्ग निवारे बांधताना सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ग्रामपंचायतींकडून देखभाल दुरुस्तीची हमी घेतलेली आहे. मात्र, या मार्गनिवाऱ्यासाठी यापूर्वी साधकबाधक खर्च केला. आता या पिकअपशेडच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार असल्याने हा खर्च करणे ग्रामपंचायतींना अशक्य आहे. प्रवासी मार्गनिवारे हे एस. टी. बसच्या प्रवाशांसाठी बांधलेले आहेत. यामधून ग्रामपंचायतींना कोणताच महसूल मिळत नाही. याचा फायदा एस.टी. महामंडळाला होत असतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 12-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here