रत्नागिरी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश असलेल्या सहकार पॅनेलची घोषणा अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चार प्रमुख पक्षांनी एकत्र येत सर्वपक्षीय सहकार पॅनेल जाहीर केले. पॅनेलचे प्रमुख आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी या सर्वपक्षीय सहकार पॅनेल जाहीर करून २१ उमेदवारांची नावेही घोषित केली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. आपल्यावर संचालक आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवला, त्याबाबत डॉ. चोरगे यांनी सर्वांचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here