पोलिस दलातील ४४ जागांसाठी आज लेखी परीक्षा

0

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील चालकपदाच्या ४४ जागांसाठी लेखी परीक्षा बुधवारी, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. शहरातील ९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रांवर मंगळवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी जाऊन पाहणी केली व तिथे असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना सूचना केल्या. परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांची कसून तपसणी करावी, परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत आणले आहे का हे तपासावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सुद्धा घ्यायची आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ३, पोलिस निरीक्षक १०, सहायक पोलिस निरीक्षक ६, पोलिस उपनिरीक्षक १७, पोलिस अंमलदार पुरुष १६० व महिला ३४ व ड्रोन कॅमेऱ्यांचीसुद्धा या परीक्षा केंद्रांवर नजर असणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here