यंदा होणार कोल्हापूरचा शाहू पारंपरिक दसरा सोहळा : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

0

कोल्हापूर : करवीर संस्थान चा इतिहासिक दसरा सोहळा यंदाच्या वर्षी 15 ऑक्टोबर रोजी पारंपारिक पद्धतीने संपन्न होणार आहे, अशी माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे. गतवर्षी कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात दसरा सोहळा भवानी मंडप मंदिरात साजरा झाला होता मात्र यंदाच्या वर्षी देवस्थान आणि देवालय खुली झाल्याने कोरोना चे नियम पाळून 15 ऑक्टोबर रोजी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि परंपरेनुसार श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, गुरु महाराज यांच्या पालखीसह हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे. कोल्हापूरवासियांच्या जिव्हाळ्याचा राजेशाही थाटात संपन्न होणारा ऐतिहासिक दसरा हा समस्त शाहू प्रेमींसह कोल्हापूरकराची सामाजिक सकारात्मकता वाढवणारा असाच ठरणारा आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here