तुतारी एक्स्प्रेसला जादा डबे जोडले जाणार

0

रत्नागिरी : आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या यात्रेसाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी दादर ते सावंतवाडी आणि परत या मार्गावर धावणाऱ्या कोकण रेल्वेवरच्या तुतारी एक्स्प्रेसला जादा डबे जोडले जाणार आहेत. या गाडीला सध्या १९ डबे असतात. त्यामध्ये दोन दिवसांसाठी तीन डब्यांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामध्ये एसी थ्री टायरचा एक, तर द्वितीय श्रेणी शयनयानाच्या दोन डब्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here