रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीसाठी डॉ. तानाजीराव चोरगे यांचा अर्ज दाखल

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलच्या वतीने विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज अर्ज दाखल केला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आज रोजी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या पक्षांनी एकत्रित येत सर्वपक्षीय सहकार पॅनेल तयार केले आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आज बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी प्राथमिक कृषी पत पुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चिपळूण या मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी संचालक दीपक पटवर्धन, किरण सामंत, राजेंद्र सुर्वे, मधुकर टिळेकर, गजानन पाटील, सौ. नेहा माने, बाबूशेठ म्हाप, गणेश लाखण आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:00 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here