टी20 वर्ल्ड कप: भारतीय संघाची नवी जर्सी लाँच

0

यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने आज (13 ऑक्टोबर) ट्वीट करून भारतीय क्रिकेट संघ नवी जर्सी लाँच केली आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये लिहीले, ‘बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहोत’ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू दिसत आहेत. बीसीसीआयने आज होणाऱ्या भारतीय संघाच्या नव्या जर्सीच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. भारतीय संघाची ही नवी जर्सी जुन्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. आत्तापर्यंत भारतीय संघ जी जर्सी परिधान करत होता ती निळ्या रंगाची होती, ही नवी जर्सी देखील निळ्या रंगाची आहे परंतु यावरील डिझाइन थोडी वेगळी आहे. या जर्सीवर निळ्यारंगाचे पट्टे दिसत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपची पहिला सामना खेळेल. हा सामना पाकिस्तान विरोधात असेल. दोन वर्षानंतर पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ आमने- सामने येणार आहेत. पाकिस्ताननंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबू दाबीमध्ये भारत अफगाणिस्तान विरोधात सामना खेळेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here