जि. प. चे आदर्श शिक्षक पुरस्कार अखेर २१ ऑक्टोबरला होणार वितरीत

0

रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा जि. प. च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २१ ऑक्टोबरला हा सोहळा जि.प.च्या लो. शामराव पेजे सभागृहात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात उकृष्ट व उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्हाभरातून २२ प्रस्ताव जि.प.कडे दाखल झाले होते. पुरस्कार समितीने त्याची तपासणी तसेच मुलाखती घेऊन १० शिक्षकांना पुरस्कार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक व एक विशेष पुरस्कार असे जाहीर झाले होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे: एकनाथ चांदे (शेडवई, ता. मंडणगड), महेश कोकरे (मौजे दापोली), राजेश भागणे (कर्जी, ता. खेड), शितल राजे (गोवळकोट, ता. चिपळूण), ममता विचारे (अंजनवेल, ता. गुहागर), नथुराम पाचकले (आंबेड बुद्रुक, ता. संगमेश्वर), विद्याधर कांबळे (लाजूळ, ता.रत्नागिरी), नानासाहेब गोरड (देवधे, ता.लांजा), दीपक धामापूरकर (सोलगाव, ता.राजापूर) तर विशेष पुरस्कार सुनील भोसले (खानवली, ता.लांजा) यांना प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी केले जाते. मात्र या दिवशी या पुरस्कार वितरणाचा मुहर्त जि.प.ला साधता आला नव्हता. आता २१ तारखेला या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शामराव पेजे सभागृहात सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून यावेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण सभापती पशुराम कदम, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here