जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत पाकिस्तानचा समावेश

0

इस्लामाबाद : जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांच्या यादीत आता पाकिस्तानचाही समावेश झाला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, आता पाकिस्तान अशा 10 कर्जदार देशांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्यावर बाहेरच्या देशांचे सर्वाधिक कर्ज आहे. तो कोरोना महामारीनंतर Debt Service Suspension Initiative साठी पात्र झाला आहे. यामुळे आता पाकिस्तानला परदेशी कर्ज घेण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

या 10 सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीत, बांगलादेश, इथिओपिया, घाना, केनिया, मंगोलिया, अंगोला, नायजेरिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि झांबिया, या देशांचा समावेश आहे. या देशांकडे एकत्रित परकीय कर्ज 2020 च्या अखेरीस $ 509 अब्ज एवढे होते. 2019च्या तुलनेत हे 12 टक्क्यांनी अधिक आहे आणि ते DSSI अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांच्या एकूण परकीय कर्जाच्या 59 टक्के होते.

DSSIच्या कक्षेत येणाऱ्या या देशांकडे 2020च्या अखेरपर्यंत गॅरंटी नसलेल्या परकीय कर्जाचे प्रमाण सुमारे 65 टक्के एवढे होते. या देशांना वेगवेगळ्या दराने परदेशी कर्ज देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एक अहवाल आला होता, की पाकिस्तानवर जेवढे कर्ज आहे, त्यात इम्रान खान सरकारचा वाटा 40 टक्के एवढा आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here