टाकेडे येथे श्रामणेर शिबिरास प्रारंभ

0

मंडणगड : तालुक्यातील टाकेडे येथे श्रामणेर शिबिरास प्रारंभ झाला. मंडणगड तालुक्यात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बौद्धजन विकास मंडळ टाकेडे, ग्रामीण व मुंबई यांच्या विद्यमाने दि. १४ ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर होणार आहे. यामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन तसेच भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धगया येथे ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधीवृक्षाच्या बिजापासून तयार करण्यात आलेल्या बोधीवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. या दिवसाचे औचित्याने मंडळाच्या वतीने १४ ऑक्टोबरपर्यंत श्रामणेर शिबिर व अनागारिका शिबिराबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन पू. भिक्खुनी एस. संघमित्रा (बुद्ध स्तूप विकास सत्याग्रही नालासोपारा), भदन्त किर्तिपिओ नागसेन (नालासोपारा), भन्ते सारीपुत्त (नालासोपारा) यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास १५ श्रामणेर व १० अनागारिका यांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच बोधीवृक्षाखालील बुद्ध मूर्तीस पुष्प अर्पण करून धार्मिक पूजापाठ विधी करून केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव, सचिव प्रभाकर जाधव, कार्याध्यक्ष अनंत जाधव, खजिनदार मनोहर जाधव, लेखापाल सचिन जाधव, देवराज जाधव, विद्याधर जाधव, गजानन जाधव (भारतीय सैनिक) आदी उपस्थित होते. यशोधरा महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ तसेच पंचशील नवतरुण मित्रमंडळ, क्रांती तरुण मित्रमंडळ सदस्य यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमास तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:31 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here