पावसमधील ७० विद्यार्थ्यांचा मनविसेत प्रवेश

0

रत्नागिरी : तालुक्यातील पावस आणि गोळप परिसरातील ७० विद्यार्थ्यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. तालुकाध्यक्ष चैतन्य शेंडे आणि उपतालुकाध्यक्ष निखिल बिर्जे यांनी या प्रवेशासाठी प्रयत्न केले. मनविसेत प्रवेश करण्याचा हा कार्यक्रम झाला तेव्हा जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, सहसंपर्क अध्यक्ष गौरव डोंगरे, मनसेचे रोजगार संघटक रुपेश जाधव, उपतालुकाध्यक्ष महेश मयेकर, मनविसे उपशहरअध्यक्ष अक्षता सुर्वे, विभाग अध्यक्ष निरंजन देवरुखकर, शाखाध्यक्ष अनिकेत जाधव उपस्थित होते. प्रवेश कार्यक्रमाला मनसेचे उपाध्यक्ष सुनील साळवी यांचीही उपस्थिती होती. पावस येथे हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:17 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here