जिल्हा बँक निवडणूक: डॉ. तानाजीराव चोरगेंसह तीन उमेदवारी अर्ज दाखल

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दि. १९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यासह तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. डॉ. चोरगेंसह महिला राखीव मतदारसंघातून शिवसेनेच्या सौ. नेहा रवींद्र माने, कुक्कुटपालन मतदारसंघातून भाजपचे अमजद बोरकर यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजपा या चार पक्षांनी एकत्र येऊन सहकार पॅनेल स्थापन केले आहे. २१ जागांवरील उमेदवार पॅनलने जाहीर केले आहे. बुधवारी डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आपला अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला, चिपळूण तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून डॉ. चोरगे जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहेत. अर्ज दाखल करताना किरण उर्फ भैया सामंत, संचालक डॉ. दीपक पटवर्धन, राजेंद्र सुर्वे, मधुकर टिळेकर, मधुकर सप्रे, गणेश लाखण, संचालिका सौ. नेहा माने, गजानन पाटील, महेश उर्फ बाबु म्हाप आदी विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 14-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here