१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. हे ४० जवान कोणाचे वडील होते कोणाचे पती होते, पण १३० कोटी देशवासियांचे ते बांधव होते त्यांना कधीही देश विसरू शकत नाही, हे सांगताना अभाविप ने रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देवरुख येथे शाहिद स्मारक येथे अभाविप देवरुख शाखेकडून आदरांजली अर्पण केली. अभाविप लांजा कडून शिपोशी येथे १०० पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले. रत्नागिरी शहरात मांडवी येथे अनेक नागरिकांच्या उपस्थितीत शाहिद दिनाचे स्मरण झाले यात माजी सैनिक सुद्धा सहभागी झाले होते. चिपळूण तालुक्यातील खरवते दहिवली या ठिकाणी जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली तर दापोली तालुक्यातील कोकण कृषी विद्यापीठात घोषणा देत अभाविप कडून आदरांजली अर्पण करण्यात आली. भारतीय सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे हे सांगताना सर्जिकल स्ट्राईक किंवा भारतीय सैनिकांच्या पराक्रमावर शंका घेणाऱ्या काही मनोवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अभविप कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक ठिकठिकाणी उपस्थित राहिले.
