गणपतीपुळे येथे ब्रह्मचैतन्य निवासी आजपासून दासनवमी उत्सव

0

गणपतीपुळे येथील स. भ. विनायक वासुदेव घनवटकर (पुजारी) यांच्या ब्रह्मचैतन्य निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे दासनवमीचा उत्सव करण्याचे योजिले आहे. शनिवार दिनांक १५/०२/२०२० रोजी सकाळी ८.०० ते १०.३० रोजी श्री समर्थाच्या मूर्तीची महापूजा, सकाळी ११.३० ते १२.०० वा. श्री समर्थाची पंचोपचार पूजा, महानैवेद्य व आरती, सायंकाळी ४.०० ते ५.०० वा. सांप्रदायिक उपासना, सायं. ६.०० ते ८.३० कीर्तनकीर्तनकार- स. भ. कौस्तुभबुवा रामदासी (मिरज) सायंकाळी ८.३० ते ८.४५ वा. आरती व मंत्रपुष्प रात्री ९.३० शेजारती. तसेच रविवार आणि सोमवारीसुद्धा विविध कार्यकामांची रेलचेल असणार आहे. तरी या दासनवमी उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुजारी ओंकार घनवटकर व कौस्तुभ कावेरी यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here