लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे श्री झरी विनायक मंदिर परिसराची स्वच्छता

0

हातखंबा : लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात लायन्स सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी प्रथमच नव्याने स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे सेवा सप्ताहानिमित्त रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथील श्री झरी विनायक मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरालगत असणारा कचरा, चिप्सचे कागद, मास्क, बाटल्या, पालापाचोळा आदी गोळा करण्यात आला. सुमारे दोन तास चाललेच्या या श्रमदानावेळी लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचे अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, सचिव सैफुद्दिन पठाण, खजिनदार गिरीश शितप, सहसचिव दत्तात्रय क्षीरसागर, सहखजिनदार डॉ. अंकिता देसाई, संदेश शिंदे, सचिन सावेकर, अवधुत कळंबटे, प्रतीक कळंबटे, शुभाली झगडे, स्नेहा सागवेकर आदी सभासद सहभागी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 14-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here