युनिसेफ व सीएसीआरमार्फत पूरग्रस्तांना आरोग्यविषयक साहित्याचे वाटप

0

गुहागर : युनिसेफ व सिटीझन असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स मुंबई यांच्यामार्फत दळवटणे गावी पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक शैक्षणिक व आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात आले. सीएससीआरचे संचालक नितीन वाधवानी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे क्रियाशील पदाधिकारी नवीन वाधवानी प्रकल्प अधिकारी सुवर्णा घाडगे, कार्यकर्ते श्वेता कदम, जेनब कटरीला, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मनोज पाटील, पंचायत समिती शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी सावर्डेकर, सरपंच शालिनी नलावडे, मुख्याध्यापक वने, मोने, गोगटे, भोजने, मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सावंतवाडी, नलावडेवाडी, भुवडवाडी, इंगवलेवाडी, बौद्धवाडी या अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दळवटणे नं.१, दळवटणे नलावडेवाडी, बाग, बदेवाडी, सावंतवाडी या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दळवटणे येथील ११७ कुटुंबांना जीवनावश्यक शैक्षणिक व आरोग्यविषयक अत्यावश्यक मदत करण्यात आली. प्रकल्प अधिकारी सुवर्णा घाडगे यांनी उपस्थितांना साहित्याच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. महिला शिबिर घेण्यात येऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन सुवर्णा घाडगे यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 14-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here